mini tractor subsidy 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर साठी अर्ज सुरू|
जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मिनी ट्रॅक्टर अर्थात 90 टक्के अनुदानावर दिल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या नवीन जिआर यासंदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजचे अर्टीकल च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये 90 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर साठी अर्ज मागवले जातात.
याच्या मध्ये राज्यातील अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील बचत गट आहेत बचत गटातील लाभार्थ्यांना पात्र करून हे मिनी ट्रॅक्टर चे अनुदान दिले जातात. आणि त्याच्यासाठी परभणी जिल्हा करीता आता अर्ज मागविण्यात आलेले आहे. त्यांच्या संदर्भातील आपण वेळोवेळी अपडेट घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण सातारा जिल्हा याप्रमाणे नांदेड जिल्ह्या बद्दल घेतलेल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 3 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत.
आणि याच प्रमाणे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 21 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. आत्ता समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून 2023 मध्ये अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीच्या मिनी ट्रॅक्टर आणि त्यांचे उपकरणे 90 टक्के अनुदानावर वाटप करण्यासाठी एक उद्दिष्ट घेतलेले आहे. याचा अंतर्गत नोंदणीकरण स्वयं साहता बचत गटाने अर्ज करावेत. अशा प्रकारचे आव्हान या अंतर्गत करण्यात आलेले आहे.
याचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत बचत गट असणे गरजेच आहे. ज्याच्या मध्ये कमीत कमी दहा सदस्य असावेत आणि या दहा सदस्य पैकी किमान आठ म्हणजे 80 टक्के अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील असणे गरजेच असणार आहे. या बचत गटांमधील सदस्याकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र आणि जातीचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक असणार आहे.
त्याच्यासाठी बचतगटांना राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बचत गटाच्या नावे एक खाते खोलावे लागणार आहे. सदरचा बँक खाते बचत गटाच्या अध्यक्ष आणि सचिव यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेला असेल. बचत गट बचत गटातील सदस्यांना यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसावा. मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी कमाल मर्यादा जी असणार आहे ते तीन लाख 50 हजार रुपये असणार आहे. आणि त्याच्या पैकी टक्के अनुदान हे शासनाच्या माध्यमातून अर्थात तीन लाख 15 हजार रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे. उर्वरित 35 हजार रुपयाचा स्वहिसा असेल तो डिमांड ड्राफ्ट द्वारे बचत गटाला द्यावा लागणार आहे.
मिनी ट्रॅक्टर साठी एक पेक्षा अधिक गटर घेण्यासाठी इच्छुक असेल तर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे. याच्यामध्ये बचत गटातील सदस्या कडे किमान एका सदस्याकडे वाहन चालवण्याचा परवाना असणे देखील गरजेचे आहे. 9 ते 18 अस्व शक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर किंवा जास्तीचे अवजारे खरेदी करण्यासाठी तीन लाख 15 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. एका सदस्याचा ड्रायव्हिंग लायसन किंवा ड्रायव्हर साठी प्रशिक्षण घेत असल्याचे प्रमाणपत्र सादर करावा लागेल.
याच्या मध्ये तीन लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त किमतीचा ट्रॅक्टर किंवा इतर जास्त उपसाधन घ्यायचे असतील तर त्यांचा स्वहिसा किंवा अतिरिक्त रक्कम बचत गटाला भरावा लागणार आहे.
आणि यात तीन लाख 50 हजार रुपये अनुदान दिले जाईल. तर उर्वरित 35 हजार रुपयांची रक्कम असेल ही 35 हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या नावे काढावा लागणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारच्या अटी व शर्तीच्या पात्रतेच्या आधारे या मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ दिला जाणार आहे. याच्यासाठी 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत परभणी जिल्ह्यातील हे अर्ज मागवण्यात आले आहेत प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाते. प्रत्येक जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी याच्या अर्जासाठी आव्हान केले जातात.
आणि त्या त्या जिल्ह्याच्या अपडेट आपल्याकडे उपलब्ध होतात. आपण वेळोवेळी माहिती घेण्याचा ग्रामीण योजना च्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. अशा प्रकारचे एक महत्त्वाचा बदल होतात याची माहिती आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो भेटूया नवीन माहितीचा नवीन अपडेट
धन्यवाद.. 🙏
Dattatray Pandurang Jadhav Renavi TAL -KHANAPUR DIST-SANGLI Maharashtra India 415311