महिला उद्योजकांसाठी केंद्र सरकारची खास योजना | Central Government’s Special Scheme for Women Entrepreneurs
मित्रांनो नमस्कार ग्रामीण योजना या चैनल वर आपले स्वागत आहे मित्रांनो बऱ्याचशा सरकारी योजना असतात. ज्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही, आणि माहिती न पोहोचल्यामुळे त्या योजनेचा सरकारी लाभ आपल्याला घेता येत नाही. त्यामुळे मी आज आपल्याला अशा एका योजने बद्दल माहिती सांगणार आहे की जी आपल्या घरातील महिलांना नक्की उपयोगी पडेल.चॅनल वरती नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा.
या योजनेचे नाव
महिला उद्योगिनी योजना या योजनेअंतर्गत महिलांना तब्बल 88 प्रकारचे छोटे व्यवसाय स्थापन करण्यासाठी आणि आर्थिक दृष्ट्या स्थिर होण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. खास महिलांसाठी असलेली उद्योगिनी योजना नेमके आहे तरी काय, त्याअंतर्गत अर्ज कसा करता येईल त्यासाठी पात्रता नियम आणि अटी काय आहेत. यासाठी अर्ज द्यायचा कुठे या प्रश्नांची उत्तर आपण समोर बघू.
या योजनेचा उद्देश
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी ती मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.उद्योगिनी ही अशी योजना आहे, की महिलांना उद्योजक व्यावसायिक म्हणून स्वतःच्या पायावर उभा राहिला मदत करते. या योजनेमध्ये ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबनला अधिक प्राधान्य दिले जाते.
पाहूया कर्ज मर्यादा किती आहे.
या योजनेअंतर्गत पात्र महिलेला तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. अर्जदार महिलेचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ते दीड लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. दिव्यांग महिला विधवा अनुसूचित जाती व जमाती 393 व्याजमुक्त कर्ज दिले जाते. इतर प्रवर्गातील महिलांना 10 ते 12 टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते.ज्या बँकेचे कर्ज घेतले जातात त्या बँकेच्या नियमानुसार व्याज दर असतो.
या योजनेसाठी कोण पात्र आहे
या योजनेसाठी 18 वर्षे ते 25 वयोगटातील सर्व महिला पात्र आहेत. योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी त्यांचा क्रेडिट स्कोर मजबूत असल्याची खात्री करावी. या पूर्वी कर्ज घेतले असेल आणि त्याची योग्य परतफेड केली नसेल तर कर्ज दिले जात नाही. सिबिल स्कोर चांगला असल्यास ते कर्ज आपणास नक्कीच उपलब्ध होईल.
कोणती कागदपत्रे जोडावीत
या योजनेसाठी अर्जासोबत दोन पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, जन्मदाखला, रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
अर्ज कोठे करावा
महिला उद्योग इं योजनेचा अर्ज घेऊन कर्ज मिळवण्यासाठी महिला त्यांच्या जवळच्या बँकेमध्ये संपर्क साधू शकतात. बजाज फायनान्स सारख्या खाजगी व्यक्ती संस्था उद्योगिनी साठी कर्ज देत आहे. तरीही महिला उद्योगिनी योजने संदर्भात सविस्तर माहिती मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच नवीन नवीन ग्रामीण योजना जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.