शेळी पालन योजनेसाठी 100% अनूदान | असा करा अर्ज #शेळीपालन | 100% Subsidy for Goat Rearing Scheme | Apply like this #shelipalan
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने #शेळीपालन या व्यवसायासाठी शेतकऱ्यांना आर्थिक साह्य मिळावे म्हणून शेळी-मेंढीपालन या व्यवसायाला तब्बल 75 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यात शेळीपालन पशु पालन मेंढी पालन यासारखे शेती पूरक व्यवसाय चांगल्या प्रमाणात केले जातात. कृषी संपन्न असलेला आपला भारत देश देशाच्या उत्पन्नात सर्वात मोठा वाटा असलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे.
पशु पालन शेळी पालन मेंढी पालन व्यवसाय दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. यातच शेळीपालन सारखा चांगला उत्पन्न देणाऱ्या व्यवसायाला आता 75 टक्के अनुदान देखील दिले जाणार आहे. याबद्दलची माहिती यात आपण आपल्या या आर्टिकल मधून आपण समजून घेऊ. शेतकरी मित्रांनो शेळी पालन हा व्यवसाय शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देतो, हा व्यवसाय कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवून देतो. शेळीपालन व्यवसाय आजकाल ग्रामीण भागात प्रत्येक शेतकरी करत असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. कमी वेळात आणि कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळते. शेतकरी शेळी पालन करत आहे आजकाल अनेक तरुण युवा शेतकरी वेगवेगळ्या जातीच्या जमातीच्या शेळ्या-मेंढ्या आणून वेगवेगळे प्रयोग करून या व्यवसायातून अतिशय चांगला नफा मिळत आहेत. शेळी पालन करून यातून लेंडी खत शेतीला पुरवून शेतीतून देखील चांगले उत्पन्न मिळत असल्याचे अनेक तरुण शेतकरी सांगत आहेत.
कमी वेळात आणि कमी खर्चात उत्पन्न चांगले मिळते येथून शेतीला देखील खत मिळत आहे. असं शेळी पालन करणारे व्यवसायिक सांगत आहेत. आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी बेरोजगार युवकांना व्यवसाय करण्याची संधी मिळावी यासाठी सरकारने शेळीपालन योजनेसाठी अनुदान स्वरुपात आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता पैसे नसले तरी शेतकरी शेळी-मेंढी घेऊ शकतो. यामध्ये लाभार्थीला तब्बल 70 टक्के अनुदान सरकार देणार आहे.
यामुळे शेतकरी बेरोजगार तरुण तसेच शेळी मेंढी पालन करू पाहणाऱ्या सर्वांना याचा फायदा होणार आहे. राज्य शासनाच्या योजनेचा लाभ हा प्रामुख्याने दारिद्र रेषेशेती अल्पभूधारक म्हणजेच 1 ते 2 हेक्टर पर्यंत शेती असलेले शेतकरी तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण यासोबत महिला आणि बचत गटात असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ प्रामुख्याने मिळणार आहे. या सोबत या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची उत्पन्नाची अट ठेवली नाही.
या योजनेचा लाभ हा प्रत्येक अर्जदाराला देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे. या योजनेचा लाभ घेताना सर्व घटकातील लाभार्थ्यांना अनुदान मिळावे हीच भूमिका असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले, परंतु त्यातही प्रामुख्याने या योजनेचा लाभ घेणार असाल तर या गोष्टींची पूर्तता आपल्याकडे आहेत का याचीही आता आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो शेळी मेंढी पालन योजना अनुदान साठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत त्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील अर्ज करणाऱ्या व्यक्तीस या योजनेचा लाभ आता मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
अल्पभूधारक शेतकरी म्हणजे किमान दोन हेक्टर किंवा पाच हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र नावावर असलेला शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे. महिला शेतकरी जर एखाद्या कुटुंबातील प्रमुख महिला असेल तर या महिलेला देखील या योजनेमध्ये प्राधान्य असल्याचं सांगण्यात येत आहे. बेरोजगार तरुण तुम्ही जर सुशिक्षित बेरोजगार असाल आणि बेरोजगार असाल तर तुमच्या रोजगाराचा प्रश्न मिळण्यासाठी या योजनेचा चांगला फायदा होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या योजनेचा लाभ प्रामुख्याने देण्यात येत आहे. बचत गटातील महिलांना देखील या योजनेअंतर्गत प्रामुख्याने लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यामुळे तुम्ही जर बचत गटात असाल तर तुम्ही देखील या योजनेसाठी त्वरित अर्ज करू शकता. तुम्ही जर शेळी किंवा मेंढी घेण्यास इच्छुक असाल म्हणजेच की जर शेळीपालन किंवा मेंढी पालन हा व्यवसाय तुम्हाला करायचा असल्यास यावर मिळणारा अनुदानासाठी तुम्हाला कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.
यामध्ये अर्जदाराचा आधार कार्ड, अर्जदाराच्या रहिवासी दाखला, जमिनीचा सात-बारा आणि आठ अ उतारा, पासपोर्ट साईज फोटो, अर्जदाराचा दाखला, अर्जदाराच्या बँक खात्याची माहिती, अर्जदार दिव्यांग असेल तर शासन मान्य दिव्यांग प्रमाणपत्र जातीचा दाखला गरज असेल तर, आणि पशुपालन प्रशिक्षण प्रमाण पत्र या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे घेऊन तुमच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र केव्हा सीएससी सेंटर मध्ये जायचे आहे. आणि या ठिकाणी पण तुमचा अर्ज भरून द्यायचा आहे.
आणि या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. अर्ज करताना देखील खालील बाबींची काळजी घ्या फॉर्म भरताना आपली माहिती व्यवस्थित भरून घ्यावी. अर्धवट माहिती असल्यास आपला अर्ज बाद केला जाऊ शकतो. आपली सर्व कागदपत्रे अपलोड करताना ती तपासून घ्या. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून आपल्याकडे ठेवा. अर्ज दाखल करताना तुमचा चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्या. राज्यातील शेती करणाऱ्या वर्गाला नेहमीच जोडधंदा आवश्यक असतो आणि यात शेळी पालन पशु पालन मेंढी पालन यासारख्या अनेक शेतीसाठी पूर्वीपासून चालू असलेल्या ओळख शेतकऱ्याला शेती करण्यासाठी पुरेसे भांडवल देखील मिळतात , आणि त्यातून आजकालची पिढी ही शेतीसोबत या वेगवेगळ्या व्यवसायांना देखील तेवढेच महत्त्व देत असल्याचे पाहायला मिळत आहे. कमी वेळात आणि कमी खर्चात चांगले उत्पादन मिळत असल्यामुळे शेतकरी शेळी पालन करत आहे. तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कसे वाटली आपल्या जर माहिती आवडली असेल तरी माहिती ईतर शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा.
DATTATRAY P. JADHAV. AP
VITA Renavi
TAL -KHANAPUR
DIST-SANGLI
Maharashtra
India
pn 415311
dattajadhav936@gmail.com
Pingback: mini tractor subsidy 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर साठी अर्ज सुरू| - graminyojna