अवकाळी नुकसान भरपाई दुप्पट दराने | avkali nuksaan bharpaai.
नोव्हेंबर 2023 मध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये अवेळी गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालं होतं, आणि याच्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून राज्यातील जवळजवळ 35 जिल्ह्यामध्ये पंचनामे पूर्ण करून या भागातील नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केलेले आहेत. आणि या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यात येणार आहे.
अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची रब्बीच्या पिकातील फळबागा याचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळावा अशा प्रकारची मागणी राज्याचे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये करण्यात आलेली होती, आणि याच वर्षी म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमात या नुकसानग्रस्तांना मदत दिली जाईल अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले होते, आणि याच पार्श्वभूमीवर आज एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेऊन शेतकर्यांना मोठ्या दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
मित्रानो नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या नुकसानीमुळे त्या भागातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेले अशा शेतकऱ्यांना एक वेळचा निविष्ठा अनुदान देण्यासाठी जिरायत पिकाचे नुकसान दिली जाणार आहेत. 8500 रुपये प्रतिहेक्टर ते 2 हेक्टर च्या मध्ये असलेले अनूदान 13600 रुपये प्रति हेक्टर आणि तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दिले जाणारे म्हणजे प्रत्येक हेक्टरी जास्तीत जास्त 40800 रुपये पर्यंत ची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर ती वितरित केले जाणार आहे. पिकाच्या नुकसानीसाठी 17 हजार रुपये प्रतिहेक्टर दोन हेक्टर चा मर्यादेमध्ये दिली जाणारी मदत आता 27 हजार रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दिली जाणार आहे. बहुवर्शिक पिकांच्या नुकसानीसाठी दिली जाणारी मदत 22500 प्रति हेक्टरी दोन हेक्टर च्या मर्यादामध्ये दिली जाणारी मदत आता 36000 प्रति हेक्टर च्या मर्यादेमध्ये दिली जाणार आहे. हे दिली जाणारी मदत 2 नोव्हेंबर 2023 च्या झालेल्या अवेळी पाऊस आणि गारपीट यासाठी असणारे याच्यासाठी 19 डिसेंबर 2013 मंत्रिमंडळाची मंजुरी देखील मिळालेले आहे.
मित्रांनो लवकरच राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये पंचनामे झाले त्याच्या जिल्ह्याच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून या नुकसान ग्रस्त शेतकऱ्या मदतीसाठी प्रस्ताव राज्य शासनाला
पाठवण्यात आले. आता या प्रस्ताव मंजूर केले जातील. आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पात्र झालेले शेतकरी किंवा शेतकर्यांच्या संख्येनुसार जिल्ह्याला नुकसानीचे मदत वितरित केले जाणार आहे.
एकंदरीत आपण जर पाहिलं तर प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार आठ हजार पाचशे रुपये प्रतिहेक्टर मदत वितरित करण्यासाठी चा निर्णय घेण्यात आलेला होता, पण त्याचा 19 डिसेंबर 2023 मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे की मदत आता दुप्पट दराने आणि ती हेक्टरचा मर्यादित देण्यासाठी निर्णय झालेला आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्याच्या निधीची तरतूद केली जजाईल.
एकंदरीत जो निधी या विकारांसाठी उपलब्ध करावा लागेल तो निधी उपलब्ध करून प्रत्येक जिल्ह्यानुसार पात्र झालेले शेतकऱ्यांची संख्या असेल आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेला निधी यांच्यासह 1gr निर्गमित केला जाईल.