🔥 जालना किंग गजानन तौर त्यांच्या मागे किती संपत्ती सोडून गेला ? 🔥 Gajanan Taur Jalna Property


गजानन तौर जालना येथील रहिवासी होता. या परिसरात त्यांची जालन्याचा किंग अशी ओळख होती. सोशल मीडियावरचे व्हिडिओ त्याची दहशत सांगतात. हत्येनंतर तौर चा मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला, तेव्हा त्याच्या समर्थकांनी फार मोठी गर्दी केली होती.

 

शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांचा गजानन तौर हा कट्टर समर्थक होता. अर्जून खोतकर सोबत गजानन तौर बऱ्याचदा पाहायला गेला. एवढेच काय जेव्हा गजानन ची हत्या झाली आणि त्याला रुग्णालयांमध्ये नेण्यात आले त्यावेळी देखील अर्जुन खोतकर तिथे उपस्थित होते.

 

गजानन तर हा सराईत गुन्हेगार 2018 पासून आतापर्यंत त्याच्यावरती सोळा केसेस आहेत. खंडणी, भांडणं आणि हत्येचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. एक वर्ष एमपीडीए अंतर्गत त्यांना त्यांची शिक्षाही भोगली होती. आणि तो तडीपार ही होता. दरम्यान गजानन चा मित्र माऊली मांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 10 डिसेंबरला रात्री आठ वाजता च्या सुमारास गजानन त्याच्या घरी गेला तेव्हा शेजारी मुलांनी तुला भेटण्यासाठी कोणीतरी आले असे गजानन तौर ला सांगितले. तेव्हा गजानन तौर ने घरातले सीसीटीव्ही फुटेज पाहिले तर या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते साडेसात वाजेच्या सुमारास भगवान डोंगरे यांनी टाइगर आणि आणखीन एक अनोळखी व्यक्ती होते.

 

माऊली ने सांगितलं टायगर आणि गजानन तौर यांची ओळख ही जेलमध्ये झाली होती. तर 11 डिसेंबरला गजानन तौर आपला मित्र पवन दिवेकर आलोक जुन्नरकर यांच्यासोबत दुपारी एक वाजता रामनगर साखर कारखान्याकडून जालना शहराकडे येत होते. दुपारी दीड ते पावणे दोनच्या सुमारास मंठा चौफुली जवळ संमती मेडिकल समोर एका पांढऱ्या स्विफ्ट डिझायर गाडी जवळ भगवान डोंगरे लक्ष्मण गोरे टायगर आणि इतर दोन अनोळखी व्यक्ती उभे होते. गजानन ने त्यांना पाहून ् गाडी थांबवण्यात सांगितली. गाडीतून खाली उतरून त्यांच्याकडे जात असताना अचानक गजानन च्या दिशेने गोळ्या मारायला सुरुवात झाली.

Advertisement

 

गजानन चे मित्र त्याच्या कडे जायचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात दोघांनी चाकूने गजानन च्या अंगावर वार करण्याचा प्रयत्न केला. जखमी असतानाही गजाननने चाकू त्याच्या हातून हिसकावून घेतला . आणि त्यापैकी एकाला चाकूने मारले. यातच डोक्यात गोळी लागल्याने गजानन खाली पडला, आणि ते सगळे आजूबाजूला पळून गेले.

 

गजानन वरती गावठी पिस्तुलातून पाच राऊंड फायर करण्यात आले होते. गजानन बेशुद्धावस्थेत असताना त्यांना कलावती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी सरकारी दवाखान्यात घेऊन जा असे सांगितले. सरकारी दवाखान्यात नेताना गजानन मृत पावल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजाननाला चार गोळ्यापैकी दोन गोळ्या लागल्या तर दोन गोळ्या अंगाला चाटून गेल्या. जुन्या भांडणातून गजानन ची हत्या झाल्याची माहिती समोर येते आहे. गजानन च्या हत्या प्रकरणातील आरोपी लक्ष्मण गोरे यांच्या व्हॉट्सऍप बायो मधील एक लाईन होती जालना किंग को टपकाना है यही सपना है आणि हि लाईन 26 ऑक्टोबरला टाकण्यात आली होती. याचा अर्थ गजानन च्या हात्याचे प्लॅनिंग हे खूप आधीपासून सुरू होतं.

 

गजानन च्या मित्रांच्या म्हणण्यानुसार गजानन जेलमध्ये होता तेव्हा टायगर आणि गजानन तौर ची ओळख झाली. आणि तिथेच त्यांच्यामध्ये वाद झाले. आणि या वादाच्या सोडातूनच गजानन ची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणांमध्ये भगवान डोंगरे लक्ष्मण गोरे आणि टाइगर या तिघांचा अन्य दोन असे एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यातील एक संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणाचा तपास सुरू आहे. जालना किंग या नावाने प्रसिद्ध असलेल्या गजानन तौर यांच्याकडे खाऊ बेनामी संपत्ती होती. यांच्याकडे जालना शहरांमध्ये दोन बंगले, चार फोर व्हीलर, शंभर तोळ्या पेक्षा जास्त सोनं, दीडशे एकर पेक्षा जास्त जमीन, आयफोन आणि अजून बरीच बेनामी संपत्ती त्याच्या मित्रमंडळींच्या नावे होती. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील शेअर करायला विसरू नका धन्यवाद


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!