हिवाळ्यात जनावरांच्या दुध वाढीसाठी कोणती काळजी घेणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी नक्की पाहा.


वाढत्या थंडीमुळे दुधाळ जनावरांवर ताण येतो आणि बऱ्याच वेळा हिवाळ्यात गोठ्यातील दुधाचे उत्पादन घटत याशिवाय थंड वातावरणामुळे जनावर विविध आजारांना बळी पडतात.

 

अचानक वाढलेल्या थंडीमुळे जनावरांची जास्त काळजी घेणे दुध वाढीचे दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. थंडीत जनावरांची काळजी घेताना कोणत्या गोष्टी कराव्यात या विषयाची माहिती आता या लेखाच्या मधून घेऊ.

 

या थंड वार्‍यापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी गोठ्याच्या चारही बाजूंनी आच्छादन करावे, पत्र्याचा किंवा वाळलेले गवत किंवा कडव्याचा थर पसरावा, गोठ्यातील जमिनीवर वाळलेल्या चाऱ्याचा थर असावा, अशक्त आणि आजारी जनावरांना वेगळे ठेवा व थंडीच्या काळात रग किंवा बारदानाने जनावरे झाकावे. गोठा ओलसर आणि थंड राहणार नाही याची काळजी घ्यावी.

 

गोठ्यात उष्णतेसाठी शेकोटी पेटवली असेल तर त्यापासून निघणाऱ्या धुराचा जनावरांपासून बचाव करावा. कारण ओलसरपणा आणि धूर यामुळे जनावरांना न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. जनावरांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहावे यासाठी जनावरांना खाण्यामधून पेंड आणि गूळ द्यावा. हिरवा आणि वाळलेला चारा आणि पशुखाद्य याचा मुबलक साठा करून ठेवावा.

 

वेळापत्रकानुसार जनावरांचा गोचीड यासारख्या बाह्य परजीवी कीटकांपासून बचाव करण्यासाठी गोठ्याची स्वच्छता ठेवावी. निरगुडी तुळस लेमन ग्रास वनस्पतीच्या वासानं बाह्य परजीवी कीटक गोठ्यात येण्याची शक्यता कमी होते. गोठा स्वच्छतेसाठी कडुनिंबाचे तेल असलेले द्रावणाची फवारणी करा. जनावरांना लाळ खुरकूत घटसर्प फऱ्या पीपीआर आंत्रविषार लंपी या रोगाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण करावे.

Advertisement

 

पशुखाद्य आणि पाण्यातून क्षार मिश्रण द्यावे. सहा महिन्यांत पुढील गर्भधारणा असलेल्या गाई-म्हशींना वाढीव खाद्य द्यावे पाणी पिण्याची भांडी स्वच्छ असावीत थंडीच्या मध्ये जनावरांना चार वेळेस कोमट पाणी पिण्यासाठी द्यावा थंडीमुळे काही वेळा जनावरांच्या शरीराची त्वचा तडकते. जनावरांच्या तळाशी त्वचा मऊ रहावी भेगा पडू नयेत या साठी काखेला ग्लिसरीन लावावे. तोंडाला भेगा पडल्या तर लगेच उपचार करावेत, दूध धार काढण्यापूर्वी कास कोमट पाण्याने धुवावे.

 

चारा पिकांची वाढ थंडीमुळे हळू हळू होत असल्यामुळे या काळात लसूणघास बरसीम किंवा चवळी या वाढणाऱ्या पिकांची लागवड करून चारा उत्पादन घ्यावे. आहारात कडू लिंबाचा पाला यांचा वापर करावा. सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान द्यावा. कारण दिलेल्या आहाराचे पचन होऊन ऊर्जानिर्मितीसाठी कमीत कमी आठ तास लागतात. म्हणजेच तयार होणारी ऊर्जा त्यांच्या तापमान विनीमयासाठी रात्री थंडीच्या काळात दोन ते सकाळी सहाच्या दरम्यान वापरता येईल. कारण या थंडीचा ताण जास्त प्रमाणात पाहायला मिळतो.

 

जनावरांना जास्त खाद्य देणे गरजेचे असते, त्यामुळे जनावरांची चयापचय क्रिया वाढते. शरीरात जास्त ऊर्जा उष्णता आणि शरीराचं तापमान नियमित ठेवलं जातं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण शेतीविषयक माहिती साठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!