सत्ता कुणाची असो, आता खुर्ची आपलीच..


राजकारण म्हटल्यानंतर प्रत्येकाचे अस्तित्वाची धडपड ही असते. मग ही धडपड विभागापुरते मर्यादित न राहता ती  महाराष्ट्रात विस्तारली जाते ‘आणि मग पुढे दिल्लीच्या राजकारणापर्यंत दिसायला लागते. ही दिल्ली काबीज करण्यासाठी प्रत्येक पक्ष धडपडत असतो आणि त्यासाठी मुरलेले राजकीय नेते स्थानिक पातळीवर आपले वर्चस्व दाखवत असतात ‘सत्ता कुणाची पण असो, आता खुर्ची आपलीच ‘ असे म्हणत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा ‘खुर्ची’ हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हा मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे नवे मोशन पोस्टर देखील सगळ्याचे लक्ष वेधून घेत आहे. या मोशन पोस्टरमध्ये निवडणुकीचा धुराळा उडताना दिसला आहे. तर लोक हातात झेंडे घेऊन जल्लोष करत आहे. पार्श्वभूमीवर दमदार संवाद आणि गाणे ऐकू येत आहेत. तर, या जल्लोषाच्या केंद्रस्थानी एक खुर्ची आहे.

Advertisement

याच ‘खुर्चीसाठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत ‘आराध्या मोशन फिल्म्स’ आणि ‘योग आशा फिल्म्स’ निर्मित या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष हगवणे आणि योगिता गवळी यांनी बरोबरीने सांभाळली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव माने आणि संतोष हगवणे यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते हगवणे यांचे असून, या चित्रपटात अभिनेता अक्षय वाघमारे, आर्यन, राकेश बापट, अभिनेत्री प्रीतम कागणे, श्रेया पासलकर यांच्यासह सुरेश विश्वकर्मा, महेश घग, कल्याणी नंदकिशोर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!